सध्या चीनमध्ये Human Meta Pneumo Virus (HMPV) चा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड मध्ये २००१ मध्ये आढळला होता. भारतात बँगलोर(कर्नाटक) मध्ये सर्वप्रथम आढळला आहे.
मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. हा विषाणू श्वसनमार्गच्या वरील भागातील संसर्गास ( सर्दीसारख्या ) कारणीभूत ठरतो.हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः फ्ल्यू(flue)प्रमाणे हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरवातीला उद्भवतो.
लक्षणे :
खोकला किंवा घरघर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं . लहान मुलं आणि वृद्धांमध्ये, एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात.
हे करू नका :
• खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळा.
• टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाका. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळा.
• आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये.शक्य असल्यास त्याला घरातच स्वतंत्र खोलीत ठेवा.
• डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
• सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे ( self medication ).
हे करा :
• खोकताना किंवा शिंकताना तोंड, नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा.
• साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवा.
• ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
• पौष्टिक अन्न खा.
• आंतररष्ट्रीय प्रवास टाळा.
• जास्तीत जास्त पाणी सेवन करा.
सरकारी सूचना :
भारतात प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
सरकारी परिपत्रक :
अधिक माहितीसाठी website :