हृदय(Heart):

  • मानवी हृदय चार कप्प्याचे असून त्याचा आकार त्रिकोणाकृती आहे.
  • मानवी हृदय व्यक्तीच्या मिटलेल्या मुठी एवढे असते.
  • पुरुषामध्ये 340 ग्रॅम तर स्त्रियांमध्ये 255 ग्रॅम एवढे वजन असते.
  • हृदयाच्या वरच्या दोन भागास अलिंद तर खालच्या दोन भागास निलय असे म्हणतात.
  • हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता 0.25 HP एवढी असते
  • हृदयाच्या उजव्या भागात अल्प ऑक्सिजन युक्त (अशुध्द) रक्त असते तर डाव्या बाजूला ऑक्सिजनयुक्त (शुध्द) रक्त असते.
  • अधोमहाशीर हृदयाच्या खालच्या भागाचे अशुध्द रक्त हृदयातील उजव्या अलिंदात आणते.
  • उर्ध्वमहाशीर हृदयाच्या वरच्या भागातील अशुध्द रक्त उजव्या अलिंदात आणते.
  • हृदयाच्या आकुंचनाला Systole (सिस्टोल) आणि हृदयाच्या प्रसरणाला Diastole (डायस्टोल) असे म्हणतात.
  • हृदयाचे एक आकुंचन आणि एक प्रसरण मिळून हृदयाचा ठोका होतो.
  • हृदयाचे ठोके: प्रौढ व्यक्तीमध्ये – 72 प्रति मिनिट.
  • स्त्रियांमध्ये – 78 ते 82 प्रति मिनिट.
  • वृध्दांमध्ये – 60 प्रति मिनिट.
  • लहान मुलांमध्ये – 120 ते 160 प्रति मिनिट.
  • हृदय 1 मिनिटाला 5 लीटर रक्त पंप करते.
  • ECG (Electro Cardio Gram) चा वापर ठोक्यांच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी केला जातो.
  • हृदयाच्या ठोक्यांचा दर नियंत्रित करण्यासाठी त्वचेखाली Pacemaker (पेसमेकर) नावाचे इलेक्ट्रीक यंत्र बसविले जाते.
  • हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथेस्कोपचा वापर केला जातो.
  • स्टेथेस्कोपचा शोध रेने लैनक यांनी लावला.
  • रक्तदाब मोजण्याठी स्फिग्मोमॅनोमीटरचा उपयोग केला जातो.
  • सर्वाधिक रक्तदाब धमन्यामध्ये असतो त्यानंतर केशवाहिन्यामध्ये, शिरा असा क्रम लागतो.
  • साधारण निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mm of Hg एवढा असतो, त्याला Normal BP असे म्हणतात.
  • जेंव्हा 160/100 mm Hg एवढा BP असतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात आणि जेंव्हा 90/60 असतो,  तेव्हा त्याला कमी रक्तदाब असे म्हणतात.
  • जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण 1967 मध्ये द. आफ्रिकेतील डॉ. ख्रिश्चन बर्नाड यांनी केली.
  • भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. वेणुगोपाल यांनी 1994 मध्ये चेन्नई येथे केले.
  • सर्व प्राण्यांमध्ये देवमाशाचे हृदय सर्वात मोठे असते. तर जमिनीवरील प्राण्यामध्ये जिराफ या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. 
  • जन्मतः ज्या बाळाच्या हृदयात दोष असतो त्या बाळाला ब्लू बेबी (Blue Baby) असे म्हणतात.
  • हृदयाकडून सर्वात जास्त रक्तपुरवठा यकृत(लिव्हर) ला केला जातो.

रक्तवाहिन्या(blood vessels):

धमनी(Artery) – हृदयातील शुद्ध रक्त शरीरातील सर्व भागांना पोचवितात. फुफ्फुसधमनी हि एकमेव धमनी आहे जी अशुद्ध रक्ताचे वहन करते. बाकी सर्व धमन्या शुद्ध रक्ताचे वहन करतात.

शीरा(Veins) – शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे पोचवितात. एकमेव फुफ्फुसशीरेत शुद्ध रक्त असते बाकी सर्व शिरामध्ये अशुद्ध रक्त असते.

रक्तकेशिका/केशवाहिण्या – धमन्याना अनेक लहान फाटे फुटतात व जाळे तयार होतात, त्यांना रक्तकेशिका म्हणतात. रक्तकेशिका या धमन्या आणि शीरांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. वेगवेगळ्या पदार्थाची, वायूंची, अन्नद्रव्याची पेशीसोबत देवाणघेवाण करण्याचे कार्य रक्तकेशिका करतात.

Leave a Comment