अस्थिसंस्था (Skeletal System) –

  • हाडे ही कॅल्शिअम फॉस्फेट व कॅल्शिअम कार्बोनेट पासून बनलेली असतात.
  • मानवी शरीराला आधार व तसेच आकार देण्याचे कार्य हाडे करतात. 
  • प्रौढ माणसामध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात.
  • आपल्या शरीरातील 206 हाडांपैकी 120 हाडे ही हात व पायामध्ये असतात.
  • आपल्या शरिरातील सर्वात मोठे हाड फिमर (Femur) होय. हे
  • हाड आपल्या मांडीमध्ये असते.
  • आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव स्टेप्स आहे. हे हाड आपल्या कानात असते.
  • आपल्या शरिरातील सर्वात मजबूत हाडाचे नाव मँडिबल(Mandible)असून ते आपल्या खालच्या जबड्यात असते.
  • मानवाची कवटी 22 हाडांपासून बनलेली आहे. त्यामध्ये 14 हाडांपासून चेहरा, तर 8 हाडांपासून ब्रेन बॉक्स बनलेला आहे.
  • प्रत्येक हातात 30 हाडे व प्रत्येक पायात सुध्दा 30 हाडे असतात.
  • प्रत्येक कानात 3 हाडे असतात.
  • प्रत्येक हात व पायाच्या बोटात 14 हाडे असतात त्यांना फॅलेंजेस (Phalanges) असे म्हणतात.
  • प्रत्येक हात व पायांच्या अंगठ्यात दोन हाडे असतात, तर इतर
  • बोटांमध्ये प्रत्येकी 3 हाड़े असतात.
  • तळहातात 13 तर तळपायात 12 हाडे असतात.
  • आपल्या शरीरात एकूण वजनाच्या 18 टक्के वजन हे हाडांचे असते
  • हाडांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास Osteology (ओस्टीओलॉजी) असे म्हणतात.

पाठीचा मणका(Vertebral Column)-

  • पाठीच्या मणक्याची संख्या 33 आहे.
  • मान – 7
  • छाती – 12
  • कंबर – 5
  • पोट – 5
  • माकडहाड – 4.

छातीच्या बरगड्या(chest Ribs)-

छातीच्या बरगड्या 24 असतात. त्यांच्या प्रत्येकी 12 जोड्या असतात.

सांधा(Joint)-

हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. या सांध्यामुळे शरीरातील हालचाल सुलभ होते.

चल सांधे (Movable Joint)- चल सांधे म्हणजे हलणारे सांधे.

या सांध्यांमुळे शरिराच्या बहुतांश भागातील हालचाली मुक्तपणे होतात. चल सांध्याचे हालचालीवरुन चार प्रकार पडतात.

अ. बिजागरीचा सांधा (Hinge Joint)– हाडांची हालचाल दरवाजाच्या बिजागरीप्रमाणे एकाच दिशेने होते. उदा. कोपराचा सांधा, गुडघ्याचा सांधा, बोटाचे सांधे.

ब. उखळीचा सांधा (Ball and Socket Joint) – कुटण्यासाठी वापरले जाणारे उखळ-मुसळ याप्रमाणे हा सांधा असतो. उखळीच्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते. उदा. खांदयाचा सांधा, कमरेचे हाड व मांडीचे हाड यात उखळीचा सांधा असतो.

क. सरकता सांधा (Sliding Joint)– हाडांची हालचाल होत असताना हाडे एकमेकांवर मागे-पुढे सरकतात म्हणुन त्यांना सरकते सांधे म्हणतात. उदा. मनगट, मणक्याची हाडे इत्यादी.

ड. खिळीचा सांधा (Pivot Joint)– एका हाडाच्या टोकाला दुसरे हाड बसलेले असते व ते हाड फिरते. उदा. कवटी व मानेचे पहिले हाड यातील सांधा.

अचल सांधे – अचल सांधे म्हणजे न हलणारे सांधे.

उदा. कवटीच्या हाडामधील सांधे.

Leave a Comment