महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना…..Agri Stack Maharashtra चे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शासनाच्या ॲग्रीस्टॅक (Agri Stack Maharashtra) योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या 7/12 उताऱ्याशी लिंक करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या आधार कार्ड शी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. जे शेतकरी आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करणार नाहीत, त्यांना पुढील प्रकारच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शासनाच्या ॲग्रीस्टॅक (Agri Stack Maharashtra) योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या 7/12 उताऱ्याशी लिंक करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या आधार कार्ड शी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. जे शेतकरी आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करणार नाहीत, त्यांना पुढील प्रकारच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी, विशेषतः Agri Stack Maharashtra योजनेचे.
नमो शेतकरी योजना,
सोसायटीचे कर्ज,
पीक विमा,
पीक कर्ज,
दुष्काळी अनुदान.
Contents
ॲग्रीस्टॅक (AgriStack) म्हणजे काय ?
ॲग्रीस्टॅक ही शेतकरी, ग्राहक, विक्रेते, आणि सरकार या शेतीशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणणारी क्रांतिकारी प्रणाली आहे. या मधून शेतकऱ्यांची ओळख( Farmer ID) निश्चित केली जाते आणि शेतीच्या सर्व प्रक्रिया मध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते.
शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजे काय ?
कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन(Digitalization) करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी(Farmer ID)असे म्हणतात.
पात्रता :
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा.
शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक.
उद्देश :
यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल.
शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल.
त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही.
भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी(Farmer ID) असणे आवश्यक.
सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी(Farmer ID) असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ किसान सन्मान योजना.
थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
शेतकरी योजनांमधून कृषि लोन (Agricultural Loan) सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक.
फायदे :
सरकारी योजनांचा लाभः
प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणासाठी अनिवार्य.
पीक विमा आणि नुकसान भरपाईची अचूक नोंदणी.
डिजिटल पीक कर्ज अंतर्गत जलद कर्ज वितरण.
आधुनिक तांत्रिक सहाय्यः
हवामानाची अचूक माहिती, मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो.
पीक पेरणी व उत्पादनवाढीसाठी कृषि तज्ञांचे अचूक मार्गदर्शन मिळते.
पारदर्शक प्रक्रियाः
सरकारी योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळतो.
पीक कर्ज, किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP( Minimum Support Price) आणि इतर योजनांमध्ये अडथळा येत नाही.
अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शनः
नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी मदतीचा योग्य उपयोग करून अधिक नफा मिळतो.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड.
७/१२ उतारा.
बँक पासबुक.
रेशन कार्ड.
आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर.
रजिस्ट्रेशन कोण करतील :
गावातील ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक.
अति महत्वाची सूचना :
व्यक्ती उपस्थित किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे.
ज्या गावांमध्ये जमीन आहे, तिथे कॅम्पमध्ये हजर राहणं आवश्यक आहे.
दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असेल, तर दोन्ही गावांमध्ये कॅम्पसाठी जावं लागेल.
जर का वेगवेगळ्या जमिनिंचा ग्राम महसूल अधिकारी एकच असल्यास त्यांच्याकडे तुमची ओळख पटवून द्या.