मार्च 2025 संपूर्ण चालू घडामोडी(Current Affairs) आणि सामान्य ज्ञान(General knowledge).

ऑस्कर पुरस्कार 2025

क्रमांक – 97 वा.

जाहीर – 3 मार्च 2025.

ठिकाण – डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, अमेरिका.

भारतातर्फे 2025 च्या ऑस्करसाठी किरण रावचा ‘लापता लेडीज’ सिनेमाचे नामांकन झाले होते. परंतु हा सिनेमा ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला.

प्रियंका चोप्राची सहनिर्मिती असलेल्या ‘अनुजा’ ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म मध्ये नामांकन मिळाले होते. परंतु हा सिनेमा ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडला.

ऑस्कर पुरस्कार 2025 पुढीलप्रमाणे :

सर्वोत्कृष्ट चित्रपट – अनोरा (Anora).

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सीन बेकर (Anora).

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मिकी मॅडिसन (Anora).

सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन ब्रॉडी – The Brutalist.

काही नुकतेच झालेले महोत्सव (2025).

51 वा खजुराहो नृत्य महोत्सव – मध्यप्रदेश.

अली आय लिगांग उत्सव – आसाम (मिसिंग आदिवासी).

आदी महोत्सव – नवी दिल्ली.

झुमूर महोत्सव – आसाम.

Sci-Fi Science Film Festival of India – गोवा.

नागोबा जटारा उत्सव – तेलंगणा.

संभार महोत्सव – राज्यस्थान.

आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव – काठमांडू, नेपाळ.

फ्लेमिंगो महोत्सव 2025 – पुलिकत सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य -आंध्रप्रदेश.

पंगसौ पास आंतरराष्ट्रीय महोत्सव 2025 – अरुणाचल प्रदेश.

हॉर्नबिल फेस्टिव्हल – नागालँड.

कनुमा पांडुगा – तेलंगणा , आंध्रप्रदेश.

बोई मेला – भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा – कोलकाता.

काग्येद नृत्य महोत्सव – सिक्कीम.

विरासत साडी महोत्सव – भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय.

आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव – हरियाणा.

पिंक लेडीज महिला फुटबॉल कप – 2025

ठिकाण – संयुक्त अरब अमिराती.

ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे

वार्षिक फुटबॉल स्पर्धा.

एकूण 6 फुटबॉल संघटनांनी  सहभाग

भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाला ब्लू टायग्रेस म्हणून ओळखले जाते‌‌.

1 st दक्षिण कोरिया 

2 ndरशिया 

3 rdभारत

पिंक लेडीज कप ही एक मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. 

मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये संघाचा विजय किंवा पराभव त्याच्या FIFA च्या पॉइंट टेबलमधील स्थानावर किंवा क्रमवारीवर परिणाम करत नाही.

भारताची शेजारील देशांना लागून असलेली सीमा. 

बांगलादेश – 4097 किलोमीटर.

चीन – 3488 किलोमीटर.

पाकिस्तान -3323 किलोमीटर.

नेपाळ – 1751 किलोमीटर.

म्यानमार – 1643 किलोमीटर.

भूतान – 699 किलोमीटर.

अफगाणिस्तान – 106 किलोमीटर.

भारताच्या सीमा एकूण  नऊ देशांशी आहेत , ज्यामध्ये  सात जमीनी सीमा  आणि  दोन सागरी सीमा आहेत.

श्रीलंका आणि मालदीव समुद्री सीमा.

भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या टॉप कंपन्या.

रिलायन्स इंडस्ट्रीज – ऊर्जा क्षेत्र – 25,707 कोटी.

TCS – सॉफ्टवेअर – 15,898 कोटी.

वेदांत – धातू आणि खाणकाम -12,826 कोटी.

HDFC बँक – बँकिंग सेवा- 11,122 कोटी.

इन्फोसिस – सॉफ्टवेअर – 9,740 कोटी.

नासाने “लूनर ट्रेलब्लेझर” उपग्रह लाँच केला.

चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी.

दिनांक – 26 फेब्रुवारी 2025.

SpaceX falcon – 9 या रॉकेट वरून प्रक्षेपण.

उपग्रह वजन –  वजन 200 किलो आणि रुंदी 11.5 फूट (3.5 मीटर) आहे.

उद्देश – चंद्रावरील पाणी ओळखणे आणि नकाशा तयार करून त्याचे विश्लेषण करणे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.

डेन्मार्क आणि भारत यांनी ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स.

उद्देश – शाश्वत ऊर्जेवर (sustainable energy) भारतासोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि जागतिक कार्बन तटस्थतेला चालना देण्यासाठी डेन्मार्कने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया (GTAI) सुरू केली आहे.

भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाकडे ध्येय.

डेन्मार्क 2045 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे ध्येय.

SEBI(Securities and Exchange Board of India).

SEBI चे 11 वे अध्यक्ष – तुहीन कांत पांडे.

स्थापणा – 12 एप्रिल 1988.

मुख्यालय – मुंबई.

ही एक वैधानिक संस्था आहे.

कार्य – शेअर बाजारावर देखरेख ठेवणे आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

SABA महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025.

SABA – South Asian Basketball Association.

विजेता – भारत.

उपविजेता – मालदीव.

ठिकाण – केडी जाधव इनडोअर स्टेडियम , नवी दिल्ली.

एकूण संघ – 3 (भारत , मालदीव , श्रीलंका).

भारतातील वारसा स्थळांमधील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन.

बिस्लेरीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत सामंजस्य करार केला.

Adopt a Heritage 2.0 Programme. 

उद्देश – वारसा स्थळांवरील ऐतिहासिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा 4 ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलस्रोतांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

चांद बाओरी (अभानेरी, राजस्थान).

नीमराणा (राजस्थान) येथील बाओरी.

रणथंबोर किल्ल्यावरील पद्मा आणि राणी तालाब (राजस्थान).

कालिंजर किल्ला (उत्तर प्रदेश) येथील बुधा बुधी तलाव.

महोत्सव व त्यांची वर्ष.

रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = 25 वर्ष. 

सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = 50 वर्ष. 

हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = 60 वर्ष.

अमृत महोत्सव (Platinum jubilee) = 75 वर्ष. 

शताब्दी महोत्सव (Centenarian Jubilee) = 100 वर्ष.

हर्ष कुमार समिती.

महाकुंभ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरी च्या चौकशीसाठी.

Leave a Comment