अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी.
3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती.
अखेर आज 8 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मराठी भाषा ही आता देशातील ७ वी अभिजात भाषा ठरली आहे.
3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
देशातील अभिजात भाषा
2004 – तमिळ.
2005 – संस्कृत.
2008 – कन्नड, तेलगू.
2013 – मल्याळम.
2014 – ओडिया.
2024 – मराठी, पाली, प्राकृत, असामी, बंगाली.
सध्या एकूण अभिजात भाषा = 11 भाषा.