Skip to content- कोरोना एक विषाणू आहे.
- 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरस प्रथम आढळला.
- कोरोनाची ही रचना प्रथमच आढळली म्हणून यास नोवल कोरोना व्हायरस 2019 असे नाव दिले .
- पुढे याचे नाव COVID -19 असे केले गेले.
- 2020 मध्ये कोरोना साथ जगभर पसरली.
- कोरोनाची लक्षणे : सर्दी, ताप, खोकला, श्वासाच्या तक्रारी, अतिसार इ.
- अगोदरच मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर सहव्याधी असणाऱ्यांना कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात झाला.
- भारतातील पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला होता तर पहिला मृत्यू कर्नाटकमध्ये झाला.
- कोरोनाने जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले.
- भारतात कोरोनाने सर्वाधिक बाधित रुग्ण व सर्वाधिक मृत्यू होणारे राज्य महाराष्ट्र आहे.
- भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू 12 मार्च 2020 ला कर्नाटकत झाला.
- कोरोना रुग्णावर लक्षणानुसार उपचार करावा लागतो.
- कमी रोगप्रतिकारक शक्ती व वृध्द यांना कोरोनाचा धोका होता.
- कोरोना उपचारासाठी रेमडेसीवीर हे इबोलावरील औषध वापरले गेले.
- 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरण सुरु झाले.
- सिरम इन्स्टिट्यूट (SIT) पुणे या संस्थेने कोव्हीशील्ड ही कोरोनावरील लस निर्माण केली.
- भारत बायोटेक हैद्राबाद या संस्थेने कोव्हॅक्सीन ही कोरोनावरिल लस ( ICMR व NIV यांच्या संयुक्त प्रयत्नातून) निर्माण केली.
- 30 जानेवारी 2020 ला कोरोना बाबत WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.
- 11 मार्च 2020 ला WHO ने कोरोना ही जागतिक महामारी (Global Pandamic) जाहीर केली.
- DRDO ने विकसित केलेल्या 2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज (2-DG) या कोवीड-19 (कोरोना) प्रतिबंधक औषधाला में 2021 मध्ये वापरास मान्यता मिळाली.
- कोरोना प्रतिबंधक उपायःवारंवार हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, योग्य शारिरीक अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, लसीकरण इ.
- कोविड-19 च्या तपासणीचा सुयोग्य प्रकार म्हणजे नाकातून घेतलेल्या नमुण्याची (Swab) तपासणी होय.
- कोविड-19 आजारात विषाणू श्वसनमार्गाने जास्त पसरतो.
- राष्ट्रीय पोषण संस्था – हैद्राबाद
- डिपीटी त्रिगुणी लस डांग्या खोकला, धनुर्वात व घटसर्प यावर उपयुक्त असते.
- कोरोनाच्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या लसींच्या दोन मात्रां/ डोसमध्ये अनुक्रमे 84 व 28 दिवसांचे अंतर ठेवले जाते.
- म्युकरमायकोसिस हा कोव्हीडनंतर होणारा बुरशीजन्य आजार आहे.
- ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवीन व्हेरीयंट प्रथम द. आफ्रिकेत आढळला.
- ओमायक्रॉनचा देशातील पहिला मृत्यू पुणे येथे 28 डिसेंबर 2021 ला झाला.
- चीनबाहेरील कोरोना व्हायरसचा पहिला मृत्यू फिलिपीन्स मध्ये झाला.
- कोरोना महामारी घोषित करणारे पहिले राज्य- हरियाणा
- पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट मिनल भोसले, मायलॅब पुणे यांनी बनविली.
- IIT दिल्ली ने संक्रमणरोधी कापड बनविले.
- कोरोनाकाळात भारतीय लष्कराने राबविलेले ऑपरेशन – CO-JEET
- 15 ते 18 वयोगटाच्या कोरोना लसीकरणास भारतात सुरुवात 3 जानेवारी 2021,
- 10 जानेवारी 2022 पासून भारतात 60 वर्षावरिल व्यक्ती व फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी बुस्टर डोस सुरु झाला.
- कोरोनाविषयक चाचण्या : RT-PCR, अँटीजेन