- मान्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर झाला आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते नवी दिल्लीमध्ये येत्या 11 डिसेंबर रोजी मान्याचीवाडीला पुरस्कारांसह अडीच कोटी रुपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.